ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या पोलीस कोठडीत २७ ऑक्टोंबरपर्यंत वाढ

ललित पाटीलला सोमवारी अंधेरी न्यायालयात साकीनाका पोलिसांनी हजर केलं होतं
ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या पोलीस कोठडीत २७ ऑक्टोंबरपर्यंत वाढ
Published on

राज्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरणा सध्या देशभरात गाजत आहे. अंमली पदार्थांच्या तस्कारी प्रकरणी मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला बंगळुरुमधूल ताब्यात घेतलं. यानंतर त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं. आज(२३ ऑक्टोबर) ललिल पाटील पोलिस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत २७ सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

ललित पाटील हा दोन आठवड्यांपूर्वी पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळून गेला होता. यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते. मुंबई पोलीसांनी बंगळुरुमधून त्याला ताब्यात घेतलं होतं. ललित पाटीलला सोमवारी अंधेरी न्यायालयात साकीनाका पोलिसांनी हजर केलं. त्यावेळी पोलिसांच्या वतिने युक्तीवाद करताना न्यायालयाला सांगितलं की, ड्रग्ज रॅकेट फार मोठं असून खोलवर पसरलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी त्याची कोठडीत वाढ करावी. ललित पाटीलने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. न्यायालाने मात्र पोलिसांचा युक्तीवाद ग्राह्य धरत ललित पाटीलच्या कोठडीत वाढ केली २७ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in