महिला पोलिसाला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न, पुण्यातील धक्कादायक घटना

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या वाहनचालकाला अडवणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस ठाण्याच्या परिसरात शुक्रवारी रात्री घडला.
महिला पोलिसाला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न, पुण्यातील धक्कादायक घटना
screen shot

पुणे: मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या वाहनचालकाला अडवणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस ठाण्याच्या परिसरात शुक्रवारी रात्री घडला. सुदैवाने लायटर चुकीच्या पद्धतीने धरल्याने तो पेटला नाही. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला, पोलिसांनी त्वरित चालकाला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संजय फकिरा साळवे (रा. पिंपरी चिंचवड, मूळगाव-जालना) असे आहे. विश्रामबाग पोलिसांची 'ड्रंक अँड ड्राइव्ह' कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडला.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ज्या काही घटना घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर पोलिसांना वरिष्ठांकडून रात्रीच्या वेळी बंदोबस्त लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, रात्रीच्या वेळी जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांची तपासणी देखील करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत. अशीच नाकाबंदी पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फरासखाना वाहतूक पोलीस ठाण्यासमोर सुरू होती. त्यावेळी

ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने एका गाडीला थांबवले, गाडीची तपासणी केली. त्यावेळी ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर ड्रायव्हरने महिला पोलिसावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदार समीर प्रकाश सावंत आणि पोलीस महिला अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जानकार हे आपली ड्युटी करत होते. संजय साळवे दारू पिऊन दुचाकी चालवत असल्याने त्याच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली. मात्र आहे. शा कारवाई करू नये यासाठी त्याने जबरदस्तीने पोलिसांच्या हातातील मशीन ओढून घेतले. मात्र पोलिसांच्या राग मनात धरून आरोपीने सहाय्यक पोलीस निरीक्षक जानकर यांच्या अंगावर आणि स्वतःच्याही अंगावर पेट्रोल टाकले. लायटरने पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र लायटर उलटा पकडला असल्याने आग पेटली नाही.

राज्यात पोलीसच सुरक्षित नाहीत - पटोले

पुण्यात महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेवर संताप व्यक्त करत काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले की, राज्यात कायदा-सुव्यवस्था कुठे राहिली आहे? महाराष्ट्र पोलीसच सुरक्षित नाहीत ही परिस्थिती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त घोषणा करतात, कृती मात्र काहीच नाही. जेलमधील आरोपींना हीआयपी ट्रिटमेंट मिळते.

ससून रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली आरोपीना फाइव्हस्टार व्यवस्था दिली जाते. नागपूरमध्येही राम झुलावर या मद्यधुंद कारचालकाने दोन मुलांना कारखाली चिरडून मारण्याची घटना घडली. ती कैस कमजोर करण्यासाठी पोलिसांवर दबाब होता. त्यामुळे या आरोपींना लागलीच जामीन मिळाला. धनदांडग्या घरातील आरोपींना कसलीच भीती राहिली नाही, म्हणूनच महिला पोलिसाला जाळण्याची हिंमत होते, असे पटोले म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in