गणेशोत्सवादरम्यान पुणे मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार ; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी मंडळांना वेळेत मिरवणुका पार पाडण्याची विनंती केली.
गणेशोत्सवादरम्यान पुणे मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार ; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य मंत्री मंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कामांचा धडाका लावला आहे. अजित पवार यांनी पुण्यावर आपलं विशेष लक्ष केल्याचं दिसून येत आहे. आता पुणे मेट्रो संबंधात त्यांनी एक नवा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी मंडळांना वेळेत मिरवणुका पार पाडण्याची विनंती केली. तर यंदा गणेशोत्सवादरम्यान पुणे मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा देखील अजित पवार यांनी केली.

यावेळी बोलता त्यांनी दहीहंडीच्या वेळेत गोविंदा पथकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं. गणपती विसर्जन हे वेळेवर होण्यासाठी त्यांनी दगडूशेठ गणपतीची मिरवणूक दुपारी ४.३० वाजता निघणार असल्याचं सांगण्यात आलं. यंदाचा गणेशोत्वस हा दणक्यात साजरी होणार असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले. त्यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज होणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

चंद्राकांत पाटील नाराज असल्याच्या चर्चा

अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर आपलं लक्ष पुण्यावर केंद्रीत केलं आहे. मध्यंतरी त्यांना पुण्याच्या पालकमंत्री पदी विराजमान केलं जाणार असल्याच्याही चर्चा जोर धरु लागल्या होत्या. अशात अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्री केल्यास पुण्यातील भाजपची ताकद कमी होऊन राष्ट्रवादीची ताकद वाढेल असं देखील बोललं जाऊ लागलं. तसंच अजित पवारांच्या पुण्यात हस्तक्षेपाने पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील नाराज असल्याचं देखील बोललं जाऊ लागलं आहे.

आज पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी चंद्राकांत पाटील यांच्या नाराजीच्या चर्चांना पुर्णविराम दिला. ते म्हणाले की, "चंद्रकांत दादा मुद्दाम बोलत नाही असं नाही. कधीकधी आमच्या वेळा जुळुन येत नाही. पण आम्ही सगळेजण खेळीमेळीने काम करतो. मुख्यमंत्री आणि आमच्यात योग्य समन्वय आहगे. पुणेकरांचा उस्तव चांगल्या पद्धतीने पार पडावा यासाठी आज आम्ही बैठकीला आलो आहोत. याचा अर्थ असा नाही की आण्ही नाराज आहोत." असं म्हणत अजित पवार यांनी नाराजीच्या चर्चांना पुर्णविराम दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in