दसरा मेळावा शिवतीर्थावरच ; परवानगी हा केवळ तांत्रिक मुद्दा - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे
दसरा मेळावा शिवतीर्थावरच ; परवानगी हा केवळ तांत्रिक मुद्दा - उद्धव ठाकरे

“शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार. दसरा मेळावा कोणाचा होणार, यावरून कोणताही संभ्रम नाही. संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी तो खुशाल करावा,” अशी ठाम ग्वाही देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दसरा मेळाव्याबाबतच्या अनिश्चिततेला पूर्णविराम दिला. “राज्यातील तमाम शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला येण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेची परवानगी हा केवळ तांत्रिक मांत्रिक भाग आहे,” असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज करून परवानगी मागितली आहे; मात्र महापालिकेने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ठाकरे यांनी दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचा निर्वाळा दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in