दसरा मेळावा : मुंबई महापालिका तपासणार 'या' गोष्टीची कायदेशीर बाजू

कारण सभेसाठी मैदान एक असले तरी त्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून अर्ज आले होते. आतापर्यंत शिवाजी पार्कवर या दोन्ही गटांकडून मेळाव्याचा दावा केला जात होता. मात्र
दसरा मेळावा : मुंबई महापालिका तपासणार 'या' गोष्टीची कायदेशीर बाजू

शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला ५६ वर्षांची परंपरा आहे. मात्र यंदा या मेळाव्याचे वेगळेच महत्त्व आहे. कारण सभेसाठी मैदान एक असले तरी त्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून अर्ज आले होते. आतापर्यंत शिवाजी पार्कवर या दोन्ही गटांकडून मेळाव्याचा दावा केला जात होता. मात्र आता महापालिकेने यात ढवळाढवळ सुरू केली आहे. मुंबई महापालिकेचा विधी विभाग शिवाजी पार्कवर होणाऱ्या मेळाव्याचा आढावा घेणार आहे. परवानगीबाबत कायदेशीर बाबी तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर कोणी जमायचे? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल, असे संकेत आहेत.

शिवसैनिकांना शिवाजी पार्कवरून विचारांचे सोने लुटता यावे, यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याला सुरुवात केली होती. मात्र, आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर या ठिकाणी शिवसेना की शिंदे गटाची सभा होणार, हा चर्चेचा विषय झाला आहे. दादरच्या शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाने महापालिकेकडे अर्जही केला आहे. मात्र, महापालिकेने याबाबत अद्याप निर्णय दिलेला नाही. दरम्यान, शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी पुन्हा एकदा महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे काय निर्णय होतो ते पाहावे लागेल. आतापर्यंत शिवसेना आणि शिंदे गटाकडून केवळ दावे केले जात होते. परंतु पालिका आता परवानगीबाबत कायदेशीर बाजू तपासत आहे. त्यासाठी विधी विभाग आढावा घेणार आहे. शिंदे आणि ठाकरे गटाकडून अर्ज आल्याने महापालिकेनेही कामाला सुरुवात केली आहे. शिवसेनेने अर्ज करून बरेच दिवस उलटले. मात्र, पालिकेने कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे शिवसेनेने आता महापालिकेने लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे महापालिका आता आढावा घेऊन परवानगीबाबत निर्णय देणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असल्याचा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय विभागप्रमुखांची बैठक घेऊन तयारी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in