अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला मिळणार नवी कार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला आपल्या जिल्ह्यात पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि फिरण्यासाठी पक्षाकडून चारचाकी वाहने देण्यात येणार
अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला मिळणार नवी कार
PM

मुंबई : अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला मिळणार नवी कार पक्षाच्या प्रचारासाठी जिल्हाध्यक्षांना कार देण्याची  घोषणा काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केली होती. आता तब्बल ४०हून अधिक कार अजित पवार गटाकडून खरेदी करण्यात आल्याची चर्चा असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार गटाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना पक्षाकडून भारी गिफ्ट मिळणार आहे. दरम्यान, बुधवारी टेस्ट ड्राईव्हसाठी गाड्या पक्ष कार्यालयात आणण्यात आल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला आपल्या जिल्ह्यात पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि फिरण्यासाठी पक्षाकडून चारचाकी वाहने देण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. तब्बल ४०हून अधिक गाड्या अजित पवार गटाकडून विकत घेण्यात येत आहेत. या गाड्या बुधवारी स्टेट ड्राईव्हसाठी पक्षाच्या कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर चर्चांना उधाण आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in