Twitter
Twitter

नाशिकमध्ये भूकंपाचे झटके,प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन तहसीलदार संदीप भोसले यांनी केले आहे.
Published on

नाशिकमध्ये पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र तेथील परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन तहसीलदार संदीप भोसले यांनी केले आहे. गुरुवारी रात्री ११ ते १२.३० च्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, उत्पादन व मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नाही, अशी माहिती उपजिल्हा दंडाधिकारी भागवत डोयफोडे यांनी दिली.

नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले तर नाशिकच्या पेठ तालुक्यात हरसूल येथे भूकंपाची तीव्रता जाणवली. पेठ तालुक्यातील खरपडी, नाचलोंढी, धानपाडा भागात तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा, खैरपल्ली या गावांनाही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. २१ जुलै रोजी रात्री ११ वाजता एका मिनिटात २.४ रिश्टर स्केलचे दोन धक्के तर दुपारी १२.३० वाजता तीन मिनिटांत ३ रिश्टर स्केलचे दोन धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहावे, असे आवाहन तहसीलदार संदीप भोसले यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in