२० नेते निवडणूक आयोगाच्या रडारवर! प्रचार काळातील आमिष दाखवणारी वक्तव्ये भोवणार; जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला अहवाल

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत मतदारांना आकर्षित करणारी वक्तव्य महायुतीतील बड्या नेत्यांना भोवण्याची शक्यता आहे. तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत केले होते.
२० नेते निवडणूक आयोगाच्या रडारवर! प्रचार काळातील आमिष दाखवणारी वक्तव्ये भोवणार; जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला अहवाल
२० नेते निवडणूक आयोगाच्या रडारवर! प्रचार काळातील आमिष दाखवणारी वक्तव्ये भोवणार; जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला अहवाल संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत मतदारांना आकर्षित करणारी वक्तव्य महायुतीतील बड्या नेत्यांना भोवण्याची शक्यता आहे. तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत केले होते. तर मटण खा कोणचेही बटणं दाबा कमळच असे वक्तव्य भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तर नगर विकास आपल्याकडे नगर विकास विभागात ‘माला’ची कमतरता नाही, मतदानाच्या आदल्या दिवशी पहाटे पहाटे लक्ष्मी दर्शन होईल, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. प्रचार काळात २० नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये केली असून यात आचार संहितेचे उल्लंघन झाले आहे का, याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवल्याचे राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यात नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना महायुतीतील प्रमुख नेत्यांची राज्यभरात सभा पार पडल्या. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय शिरसाट, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ अशा बड्या नेत्यांनी सभाचा सपाटाच लावला होता. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत आपल्या पक्षाच्या अधिकाधिक जागा निवडून याव्यात यासाठी महायुतीतील प्रमुख नेत्यांसह मंत्र्यांनी ही सभेच्या माध्यमातून आपल्या पक्षाला मतदान करा, अशी साद घातली. मात्र याच वेळी मतदारांना प्रलोभने दाखवणारी वक्तव्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, चित्रा वाघ अशा २० हून अधिक नेत्यांनी केली. या प्रमुख नेत्यांची वक्तव्ये आचार संहितेचे उल्लंघन करणारी आहेत का, याची चौकशी करण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यात नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली असताना महायुतीतील मित्रपक्षांतच संघर्षाचे स्फोटक वातावरण निर्माण झाले आहे. प्रचारसभांमध्ये एकमेकांवर कुरघोड्या आणि टीकाटिप्पणी करण्याची स्पर्धा सुरू असताना, वादग्रस्त वक्तव्यांमुळे आता निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, आमदार चित्रा वाघ यांच्यासह एकूण २० जणांच्या भाषणांची निवडणूक आयोगाकडून तपासणी होणार आहे.

कॅमेऱ्याच्या आधारावर तपासणी!

ज्या ज्या ठिकाणी नेत्यांच्या सभा असतात त्या त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कॅमेरे असतात. त्याच्या आधारे आता तपास केला जाणार आहे. २० नेते ज्यांच्या वक्तव्यांची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.

logo
marathi.freepressjournal.in