ईडीची हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या बँकेवर छापेमारी; कर्मचारी ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडीने केली होती छापेमारी
ईडीची हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या बँकेवर छापेमारी; कर्मचारी ताब्यात

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडीने धाड टाकली होती. गेले २ दिवस या बँकेची झाडाझडती सुरु होती. आता यासंबंधित ईडीने कारवाई केली असून बँकेच्या ५ कर्मचाऱ्यांना ताब्यात गेहटले आहे. हसन मुश्रीफांना हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. ईडीने जिल्हा बँकेत दोन वेळा धाडी टाकल्या आहेत. मात्र, आता यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरल्याचे चित्र उभे राहिले आहे. "जर ईडीने त्यांना त्रास दिला तर ईडीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करु," असा इशारा कर्मचारी संघटनेने त्यांना दिला आहे.

ईडीने कारवाई करून काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ईडीच्या चौकशीला विरोध केलेला नाही. मात्र, त्याचे म्हणणे आहे की, अधिकारी कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी थांबवून घेतात हे चुकीचे आहे." अशी भूमिका कर्मचारी संघटनेने ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली. या कर्मचाऱ्यांविरोधात समन्स असल्याचे सांगत त्यांना चौकशीसाठी घेऊन जावे लागेल असे ईडीकडून सांगण्यात आले. दरम्यान, याआधीही ईडीने राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयावर तसेच, घरांवर छापेमारी केली होती. यावेळी त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in