हसन मुश्रीफांच्या घरी ईडीचा छापा ; पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान ईडीचे अधिकारी दाखल झाल्याची माहिती

राज्यात विरोधकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही मोहीम हाती घेतली आहे, असा आरोप
हसन मुश्रीफांच्या घरी ईडीचा छापा ; पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान ईडीचे अधिकारी दाखल झाल्याची माहिती

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आज पुन्हा एकदा ईडीने छापा टाकला आहे. गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली. ईडीचे अधिकारी पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचे वृत्त आहे. यापूर्वी ११ जानेवारी रोजी ईडीच्या पथकाने कोंढवा येथील मुश्रीफ यांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानावर आणि गणेशखिंड रस्त्यावरील कार्यालयावर छापे टाकले होते. त्यावेळी ईडीच्या पथकाने काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती.

कोल्हापुरातील साखर कारखान्याच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या व्यवहारात काळा पैसा गुंतवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांनी साखर कारखाना विकत घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर ईडीने मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापूर येथील मालमत्तांवर छापे टाकून कारवाई केली.

दरम्यान, मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. "राज्यात विरोधकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही मोहीम हाती घेतली आहे", असा आरोप त्यांनी याचिकेद्वारे केला आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी किरीट सोमय्या यांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in