संजय राऊत यांच्या भावाला ईडीचे समन्स

महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे.
संजय राऊत यांच्या भावाला ईडीचे समन्स
ANI

मुंबई : महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत यांना चौकशीचे समन्स बजावले आहे. या समन्सनुसार संदीप राऊत यांना पुढच्या आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर तसेच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांच्या पाठीशी ईडीची पिडा लागली आहे. याआधी कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीनंतर आता संदीप राऊत यांना ईडीचे समन्स पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे संदीप राऊत यांची याआधी मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ईडीकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in