१०वीच्या १००टक्के निकालासाठी शिक्षणविभागाचा अॅक्शन प्लॅन

शिक्षकांकडून ट्रेनिंग, सर्व विद्यार्थ्यांना लेक्चर, व्हिडिओ-ऑनलाइन प्रोग्राम, स्टडीरूम आदी माध्यमातून शिक्षण दिले जाणार
१०वीच्या १००टक्के निकालासाठी शिक्षणविभागाचा अॅक्शन प्लॅन
ANI

यंदा मुंबई महापालिकेच्या १०वीतीलविद्यार्थ्यांचा निकाल ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचला. दर्जेदारशिक्षण व अनेक सोईसुविधा यामुळे ९७ टक्के निकालाचेउद्दिष्ट सफल झाले आहे. आता९७ टक्क्यांपर्यंत न थांबता१०० टक्के निकालाचे उद्दिष्टगाठण्यासाठी अभ्यास पद्धती, जादाक्लास असे विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे शिक्षण सहआयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये गरजू विद्यार्थी शिक्षणासाठी येत असल्याने त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबर अनेक सोईसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यामुळे दरवर्षी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची संख्या वाढत असून, दहावीच्या निकालात प्रत्येक वर्षी वाढहोत असून यावर्षी दहावीचानिकाल ९७.१०टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांचीवाढ झाली आहे. विशेष म्हणजे, यावर्षीच्या राज्य आणि मुंबईच्या सरासरी ९६.९४ टक्के निकालापेक्षा पालिकेचा दहावीचा निकाल जास्त लागलाआहे.गेल्यादोन वर्षांत ही सुधारणा झाल्यामुळे पालिकेच्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठीविविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.शिवाय पालिकेचा विद्यार्थी स्पर्धेत टिकावा यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या केंब्रीजसह ‘आयसीएसई’,‘सीबीएसई’बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत.

गुण वाढावेत यासाठी नव्या पद्धती,गणित-इंग्रजी विषयांसाठी विशेष तंत्रज्ञानावर भर,विशेषप्रावीण्य असलेल्या शिक्षकांकडून ट्रेनिंग, सर्व विद्यार्थ्यांना लेक्चर, व्हिडिओ-ऑनलाइन प्रोग्राम,स्टडीरूम आदी माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in