तिहेरी अपघातात आठ जण ठार ;नगर-कल्याण महामार्गावर रिक्षा-ट्रकची धडक

या अपघातात ओतूरवरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने रिक्षा आणि ट्रकला जोरदार धडक दिली.
तिहेरी अपघातात आठ जण ठार ;नगर-कल्याण महामार्गावर रिक्षा-ट्रकची धडक
PM

पुणे : नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघात होऊन आठ जण जागीच मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात ओतूरवरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने रिक्षा आणि ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुले यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे पती, पत्नी आणि दोन लहान मुलांसह रिक्षाने प्रवास करीत होते. यावेळी जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळील अंजिराची बाग येथे हा अपघात झाला. यात पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. गणेश मस्करे (३०), कोमल मस्करे (२५), हर्षद मस्करे (४), काव्या मस्करे (६), अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात साडेदहानंतर आणि ११च्या दरम्यान घडली आहे.

डिंगोरे येथील अपघाताची ही माहिती समजताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. या अपघाताचा पुढील तपास ओतूर पोलीस करत असून अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ओतूर येथे शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in