शिंदेंचा मेळावा सुरु होण्याआधीच गालबोट ; अर्जुन खोतकर यांच्या ताफ्यातील आठ ते दहा गाड्यांना अपघात

दौलताबादजवळ समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला असून या गाड्या मुंबईच्या दिशेने येत होत्या. या गाड्या परवानगीशिवाय महामार्गावरून
शिंदेंचा मेळावा सुरु होण्याआधीच गालबोट ; अर्जुन खोतकर यांच्या ताफ्यातील आठ ते दहा गाड्यांना अपघात

बीकेसी मैदानावर शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या ताफ्यातील आठ ते दहा गाड्यांना अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दौलताबादजवळ समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला असून या गाड्या मुंबईच्या दिशेने येत होत्या. या गाड्या परवानगीशिवाय महामार्गावरून नेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही. नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा महामार्ग खुला केल्याने आता शिंदे गटावर चौफेर टीका होत आहे.

सर्वसामान्यांसाठी बंद असलेल्या महामार्गावरून अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या निघाल्या. दसरा मेळाव्यासाठी अर्जुन खोतकर यांच्या गाड्यांचा ताफा इतर नेत्यांसह मुंबईच्या दिशेने निघाला होता. त्यानंतर दौलताबादमध्ये हा अपघात झाला. या अपघातात काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, उद्घाटनाशिवाय महामार्गावरून गाड्या नेण्याबाबत खोतकर यांच्याशी चर्चा केली असता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे खोतकर यांनी सांगितले. उद्घाटनापूर्वी समृद्धी महामार्गावरून गाड्या नेण्यात आपली चूक झाल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in