एक बटण दाबले की देशात हाहाकार माजेल! हनी ट्रॅप प्रकरणात एकनाथ खडसेंचाही दावा

हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरू असतानाच, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीला हनी ट्रॅपबद्दल सगळे माहिती आहे, असा दावा केला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरू असतानाच, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीला हनी ट्रॅपबद्दल सगळे माहिती आहे, असा दावा केला आहे. तसेच या प्रकरणी एसआयटीमार्फत लोढाची चौकशी करावी, असी मागणीही खडसे यांनी केली आहे. एक बटन दाबले तर हाहाकार माजेल, असा इशारा खडसे यांनी दिला आहे.

नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणात ७२ वरिष्ठ अधिकारी आणि काही नेते अडकल्याची चर्चा सुरू असताना एकनाथ खडसेंनी खळबजनक आरोप केला आहे. “प्रफुल्ल लोढाने एक व्हिडीओ बनवला होता. त्यात अनेक तथ्य आढळून आली आहेत. एक बटण दाबले की संपूर्ण देशात हाहाकार माजेल. इतकेच नव्हे, तर प्रफुल्ल लोढाकडे सगळे व्हिडीओ आहेत. त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली आहे.

“प्रफुल्ल लोढा सध्या भाजपमध्ये असून तो गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील रहिवासी असून तो गिरीश महाजनांचा कार्यकर्ता आहे. लोढाविरोधात अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका अशा दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिला गुन्हा दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणे, या मुलींना छळणे, ब्लॅकमेलिंग करणे असा आहे. तर दुसरा गुन्हा हा हनी ट्रॅपसंदर्भात आहे. या गुन्ह्यात अल्पवयीन मुलींना आमिष दाखवणे, त्यांचे अश्लील फोटो काढणे, असे गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत,” असेही खडसे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in