राष्ट्रवादी रावेरसाठी नवा उमेदवार शोधणार; सोमवारी मुंबईत होणार बैठक

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने प्रथम एकनाथ खडसे यांचे नाव जाहीर केले होते.या मतदारसंधात गेले दहा वर्ष खडसेंची सून रक्षा खडसे या प्रतिनिधित्व करीत आहे. यामुळे सासरा विरुद्ध सून असा सामना रंगेल अशी अटकळ बांधत राज्यभर हा मतदारसंघ गाजला
राष्ट्रवादी रावेरसाठी नवा उमेदवार शोधणार; सोमवारी मुंबईत होणार बैठक

विजय पाठक / जळगाव

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवार मिळाला नसून उमेदवार निवडीसाठी सोमवारी मुंबईत बैठक होत आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने प्रथम एकनाथ खडसे यांचे नाव जाहीर केले होते.या मतदारसंधात गेले दहा वर्ष खडसेंची सून रक्षा खडसे या प्रतिनिधित्व करीत आहे. यामुळे सासरा विरुद्ध सून असा सामना रंगेल अशी अटकळ बांधत राज्यभर हा मतदारसंघ गाजला. काही काळानंतर एकनाथ खडसे यांनी आपण प्रकृतीच्या कारणाने निवडणूक लढू शकत नसल्याचे पक्षाला कळवले. आता रक्षा खडसे यांना भाजपाकडून तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झााली आहे तर एकनाथ खडसे हे भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांनी आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला रक्षा खडसेंविरोधात लढण्यासाठी सक्षत उमेदवाराची गरज आहे .

या मतदारसंघासाठी यापूर्वी माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, उद्योजक श्रीरात पाटील आदी नावे समोर आली होती. मात्र भाजपातूनच कुणी नाराज व्यक्ती मिळते काय याकडे राष्ट्रवादीतून चाचपणी होत होती. मात्र तसा उमेदवार आढळून आलेला नाही. अखेर यावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी ८ एप्रिलला मुंबईत राष्ट्रवादीची बैठक होत असून त्यात नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसे भाजपमधून राष्ट्रवादीत आले, त्याचा राष्ट्रवादीला पक्ष विस्तारासाठी काही फायदा झााला नाही. त्या पक्षातून कुणी फारसे आले नाहीत. त्यामुळे आता खडसे पक्षातून गेले तरी पक्षाचा काहीही तोटा होणार नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले. खडसे कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा असून त्यांनी भाजपात जाण्यास नकार दिला आहे. तसेच आपण विधानसभा लढवण्यासाठी उत्सुक असून लोकसभा लढवण्यात रस नसल्याचे सांगत रावेरमधून लढण्यास नकार दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in