जळगाव : "राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत तसेच आपल्या आजाराबाबत संशय निर्माण करणारी विधाने केल्याबाबत नोटीस दिली असता, त्यास उत्तर न दिल्याने मंगळवारी सेशन कोर्टात केवळ एक रूपयाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याची माहिती माजी मंत्री व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
एकनाथ खडसे यांना हदयविकाराचा त्रास झााल्याने त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला नेण्यात आले होते. तेथे ते खासगी रूग्णालयात दाखल होते. त्यांना हदयविकाराचा झटका आला होता. गिरीश महाजन यांनी त्यांच्या आजाराबाबत शंका घेतल्या होत्या व आजारी असल्याचे दाखवून कोर्टापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे विधान केले होते. तसेच एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूविषयी शंका घेणारी विधाने केल्याने खडसे दुखावले गेले होते. यावर एकनाथ खडसे यांनी त्यांना नोटीशीव्दारे आपण केलेली विधाने सिद्ध करा, असे आव्हान दिले होते. या नोटीशीला गिरीश महाजन यांनी उत्तर दिले नाही, म्हणून मंगळवारी सेशन कोर्टात मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात एक रूपयाच्या मूल्याची अब्रूनुकसानीचा दावा दाखल केल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.