एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री; शिंदे गटाच्या 'या' नेत्याने मारला टोला

उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचा समाचार घेत शिंदे गटाच्या नेत्याने लगावला टोला
एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री; शिंदे गटाच्या 'या' नेत्याने मारला टोला

"एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना फारसे वाईट वाटले नसेल," असा टोला शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी लगावला आहे. ते म्हणाले की, "आम्हाला जे काही प्रयत्न करायचे होते ते आम्ही केले. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचे हे उद्धव ठाकरेंनीच ठरवले होते. पण शरद पवारांनी जबरदस्ती मला मुख्यमंत्री व्हायला लागले असे स्वतः उद्धव ठाकरेच म्हणाले आहेत. नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असले असते. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंच्या मनातलेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना फारसे वाईट वाटले नसेल."

शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर कोल्हापूरमध्ये बोलताना म्हणाले की, "अयोध्येत महाराष्ट्र भवन बनवण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची इच्छा आहे. या दौऱ्यामध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेटदेखील घेतील." अशी माहिती दिली. पुढे ते म्हणाले की, "आम्ही लोकांची कामे करतो, त्यामुळे आम्हाला जाहिरातबाजीची गरज नाही." असे म्हणत आदित्य ठाकरेंना टोला लगावला. ते म्हणाले की, " जाहिरातबाजीची गरज ही आदित्य ठाकरेंना जास्त आहे. तब्बल अडीच वर्ष पर्यावरण मंत्री राहूनही त्यांनी काहीही केलेलं नाही. मुंबईतील सर्वाधिक प्रदुषित झालेली हवा ही आदित्य ठाकरेंचीच देणगी आहे." अशी टीका त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in