दावोसमध्ये एकनाथ शिंदे-गौतम अदानी यांची भेट; राज्यातील पायाभूत सुविधांसह गुंतवणुकीवर चर्चा

जागतिक आर्थिक परिषेत पहिल्याच दिवशी महत्त्वाच्या तीन प्रकल्पांसाठी 70 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
दावोसमध्ये एकनाथ शिंदे-गौतम अदानी यांची भेट; राज्यातील पायाभूत सुविधांसह गुंतवणुकीवर चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळासह स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात 15 ते 19 जानेवारीदरम्यान होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषेत सहभागी झाले आहेत. यादरम्यान, अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज(17 जानेवारी) मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र दालनात भेट घेतली. यावेळी त्यांच्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्र, गुंतवणुकीच्या संधी या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या 'एक्स'हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.

या परिषेदत मुख्यमंत्री शिंदे यांचा राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणण्यावर भर आहे. बेल्जियम येथील एबीआयएन बेव्ह ही बहुराष्ट्रीय कंपनी महाराष्ट्रात 600 कोटींची गुंतवणूक करणार असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे राज्यात शेकडो रोजगार निर्माण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

या परिषदेत पहिल्याच दिवशी महत्त्वाच्या तीन प्रकल्पांसाठी 70 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in