एकनाथ शिंदे नॉट रिचेबल, गुजरातमधील हॉटेलमध्ये मुक्काम - सूत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी १२ वाजता शिवसेनेच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल, गुजरातमधील हॉटेलमध्ये मुक्काम - सूत्र

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर खळबळ माजलेली दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ११ आमदार गायब असल्याचे कळते. सूत्रांच्या माहितीनुसार ते सुरतमधील एका हॉटेलमध्ये असून १२ वाजता प्रेस काँफरन्स होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काळ विधानसभा निवडणुकीत संशयास्पद क्रॉस व्होटिंग झाल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी १२ वाजता शिवसेनेच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला अस्मान दाखविले आहे.आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिंकत असताना काँग्रेसच्या चंद्रकातं हंडोरे यांना मात्र पराभवाचा फटका बसला आहे.भाजपाच्या प्रसाद लाड यांनी चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला आहे. भाजपाचे पाचही उमेदवार जिंकले आहेत.शिवसेनेचे सचिन अहिर,आमश्या पाडवी. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर,एकनाथ खडसे तर काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले आहेत. भाजपाचे प्रवीण दरेकर,राम शिंदे,श्रीकांत भारतीय,उमा खापरे आणि प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे.काँग्रेसच्या दोन पैकी एकाही उमेदवाराला पहिल्या फेरीत यश मिळविणे शक्य झाले नाही.हंडोरे आणि जगताप यांना मिळालेली मते पाहता काँग्रेसची तीन मते तरी फुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तर राज्यसभा निवडणुकीत १२३ मते मिळविणा-या भाजपाने यावेळी १३४ मते मिळविल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाने महाविकास आघाडीला राज्यसभेनंतर विधानपरिषदेतही जोरदार असा धक्का बसला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीतही मास्टरस्ट्रोक लावत आपले पाचही उमेदवार निवडून आणले असून आघाडीला विशेषत काँग्रेसला धक्का दिला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in