
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज्याला पर्यायी सरकार द्यायचे होते, अशावेळी देवेंद्र फडणवीस यांचेच नाव पुढे होते. मात्र अचानक एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, असे समोर आले. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी ७.३० ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अगदी शेवटच्या देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
काय म्हणाले जे पी नड्डा ?
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सामील होणार... ट्विटच्या माध्यमातून नड्डा यांनी सांगितले की, भाजपने महाराष्ट्रातील लोकांच्या भल्यासाठी मोठे मन दाखवत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रिमंडळात सामील होण्याचा निर्णय मोठ्या मनाने घेतला आहे, यावरून त्यांची महाराष्ट्रातील जनतेशी असलेली ओढ दिसून येते."