
राज्यातील जनतेला धक्के वर धक्के देणाऱ्या घटना सध्या राज्याच्या राजकारणामध्ये घडत आहेत. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज्याला पर्यायी सरकार द्यायचे होते, अशावेळी देवेंद्र फडणवीस यांचेच नाव पुढे होते. मात्र अचानक एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आज केली. एकनाथ शिंदे यांच्या सरकारला भाजप बाहेरून पाठिंबा देणार असल्याची घोषणा देखील फडणवीस यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.