एकनाथ शिंदेंची नाराजी मविआ ला महागात पडणार ?

एकनाथ शिंदेंची नाराजी मविआ ला महागात पडणार ?

मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मार्गदर्शन करावे अशी शिंदेची मागणी होती परंतु आदित्य ठाकरे यांनी आमदारांशी बातचीत केल्याने शिंदे नाराज झाले होते
Published on

गेल्या काही महिन्यांपासुन शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याची चर्चा सुरु होती. आदित्य ठाकरे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदारांना मार्गदर्शन केल्याने शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत तरी यश आलेलं नाही. असं असतानाच आता एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याच्या बातमी प्रसारमाध्यमांनी दिली आहे. मात्र एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत यासंदर्भातील ठोस माहिती अजुनही समोर आलेली नाही. काल सायंकाळी निवडणुकीचा निकाल लागण्याच्या आधीपासूनच शिंदे शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नसल्याची माहिती मिळाली. एकनाथ शिंदेंसोबत अनेक आमदारही शिवसेनेच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहेत. पार्श्वभूमीवर दुपारी आज १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसेना आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक बोलावली आहे.

शिंदेच्या नाराजगीमुळे मते फुटली ?

एकनाथ शिंदेसह अनेक आमदारांचे फोन ‘नॉट रिचेबल’ झाले होते. सध्या शिंदे आमदारांसोबत सुरत मध्ये गेले आहेत अशी माहिती सुत्रांकडून मिळली आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेले काही दिवसापासुन मतभेद सुरु होते. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मार्गदर्शन करावे अशी शिंदेची मागणी होती परंतु आदित्य ठाकरे यांनी आमदारांशी बातचीत केल्याने शिंदे नाराज झाले होते. त्यामुळे शिंदेच्या नाराजगीमुळे मते फुटण्याची शक्यता आहे.

कोणाचे १२ वाजणार ?
आज दुपारी १२ वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये शिंदे काय भुमिका मांडणार आहेत यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच १२ वाजता मुख्यमंत्री वर्षावर बैठक घेणार आहेत. त्यामुळे या सरकारचे काय होणार कोणाचे १२ वाजणार हे कळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in