मुंबई : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या जागी आता नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून एस. चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव राहुल शर्मा यांच्या सहीने यासंदर्भातील आदेश बुधवारी जारी करण्यात आले. श्रीकांत देशपांडे हे येत्या एप्रिल महिन्याअखेर निवृत्त होत आहेत. एस. चोकलिंगम हे १९९६ च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत.