...म्हणून महाराष्ट्रातील निवडणुका लांबणीवर, EC ने सांगितलं कारण; जम्मू-काश्मीरसह हरयाणासाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र विधानसभेची मुदत येत्या २६ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल अशी अपेत्रा होती.
...म्हणून महाराष्ट्रातील निवडणुका लांबणीवर, EC ने सांगितलं कारण; जम्मू-काश्मीरसह हरयाणासाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर
Published on

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (दि.१६) जम्मू-काश्मीर आणि हरयाणा या दोन राज्यांसाठी विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. जम्मू काश्मीरमधील निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होणार आहेत. तर, हरयाणातील निवडणुका एकाच टप्प्यात होतील.

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक वेळापत्रक -

-एकूण ९० जागांवर निवडणूक

-जम्मूतील ४३ आणि काश्मीरमधील ४७ जागांवर होणार मतदान

-पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबर रोजी

-दुसऱ्या टप्प्यातील मतदान २५ सप्टेंबर रोजी

-तिसऱ्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबर रोजी

हरयाणा विधानसभा निवडणूक वेळापत्रक -

एकूण ९० जागांवर निवडणूक

१ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात होणार निवडणूक

मतमोजणी कधी?

४ ऑक्टोबर रोजी दोन्ही राज्यांमधील मतमोजणी होणार

...म्हणून महाराष्ट्रातील निवडणूक लांबणीवर

महाराष्ट्र विधानसभेची मुदत येत्या २६ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल अशी अपेत्रा होती. मात्र, आयोगाने महाराष्ट्र निवडणुकाचं वेळापत्रक जाहीर केले नाही. त्याचे कारणही केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

"गेल्या वेळी महाराष्ट्र आणि हरयाणाची निवडणूक एकत्र झाली होती. पण, त्यावेळी जम्मू काश्मीरच्या निवडणुकांचा मुद्दा नव्हता. मात्र यावेळी चार राज्यांच्या निवडणुका (जम्मू-काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड) आहेत. त्यानंतर लगेचच दिल्ली विधानसभेचीही निवडणूक आहे. यावेळी जम्मू-काश्मीरच्याही निवडणुका होत असल्याने एकंदर यंत्रणेचा विचार करता आम्ही यंदा दोन-दोन राज्यांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतलाय. शिवाय, जम्मू-काश्मीरची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच मध्येच दुसऱ्या राज्यासाठी निवडणूक जाहीर करणं योग्य नाही. याशिवाय इतर अनेकही कारणे आहेत. महाराष्ट्रात पाऊस होता, त्यामुळे बीएलओची कामे झालेली नाहीत. तसेच, आगामी काळात गणोशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी असे सण देखील आहेत, त्या अनुषंगाने नियोजन करत आहोत. विधानसभेची मुदत संपण्याच्या सहा महिन्यांच्या आतच या निवडणुका होतील", असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आता दिवाळीनंतर राज्याती निवडणुका पार पडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in