राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील 7750 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुन्हा एकदा शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे वर्चस्व ठरवणार
राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील 7750 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर
Published on

अंधेरी पोटनिवडणुक पार पडताच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 7751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीची धुमशान पाहायला मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात राजकीय पेच निर्माण झाला होता. शिवसेनेत दोन गट पडल्याने शिंदे आणि ठाकरे गट असा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम राज्य शासनाबरोबरच नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींवरही दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुन्हा एकदा शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे वर्चस्व ठरवणार आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होणार आहे. 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाची प्रकिया सुरू होणार असून 18 डिसेंबर रोजी मतदान व 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 

logo
marathi.freepressjournal.in