इलेक्टोरल बाँड्स देशातील आजपर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

केंद्र सरकारची इलेक्टोरल बाँड्स योजना देशातील आजपर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा ठरला आहे, असा आरोप...
इलेक्टोरल बाँड्स देशातील आजपर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्वांत जास्त लाभ भाजपला झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसचा क्रमांक दिसून येत आहे. यामुळे केंद्र सरकारची इलेक्टोरल बाँड्स योजना देशातील आजपर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा ठरला आहे, असा आरोप वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

भाजपने इलेक्टोरल बाँडसच्या माध्यमातून ६ हजार ६० कोटी रुपये कमावल्याची टीका एक्सच्या माध्यमातून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच, आता भाजप-आरएसएस सरकारने कंपन्यांना इलेक्टोरल बाँड्ससाठी काय ऑफर दिली हे पाहणे मनोरंजक ठरणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. निव्वळ नफ्यामध्ये २१५ कोटी असलेल्या कंपनीने १ हजार ३६८ कोटींचे इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणे कसे शक्य आहे? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, निव्वळ नफ्यामध्ये फक्त १० कोटी असलेल्या आणखी एका कंपनीने १८५ कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप आणि त्यांच्या भ्रष्ट गुंडांना तुरुंगात टाकले पाहिजे, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in