Elon Musk : महाराष्ट्र-कर्नाटक वादात या नेत्याने चक्क इलॉन मस्कलाच खेचलं; म्हणाले, जाता जाता...

एकीकडे इलॉन मस्कने (Elon Musk) ट्विट केले आणि दुसरीकडे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने महाराष्ट्र कर्नाटक वादामध्ये खेचलं
Elon Musk : महाराष्ट्र-कर्नाटक वादात या नेत्याने चक्क इलॉन मस्कलाच खेचलं; म्हणाले, जाता जाता...
Published on

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या काही ट्विटमुळे हा सीमावाद आणखी चिघळत गेला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मुद्दा बैठकीत काढल्यानंतर ते ट्विट मी केलेले नाही, हॅक झाले आहे, असे उत्तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी दिले. यानंतर विरोधकांनी त्यांनी दिलेल्या या कारणावर टीका केली. आता या वादामध्ये चक्क ट्विटरचा नवा मालक इलॉन मस्कलाच (Elon Musk) खेचण्यात आले आहे.

इलॉन मस्कने ट्विट करत म्हंटले होते की, मी पदावरून पायउतार होऊ का? असे म्हणत जनमताचा कौल 'वोटिंग पोल'च्या रूपात विचारला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील ट्विट करत म्हणाले की, "कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगत आहेत. हे ट्विट नक्की कोणी केले आहे? यावर आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या." असा प्रश्न विचारला.

logo
marathi.freepressjournal.in