राज्य कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी; कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे कौतुकोद्गार

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कौशल्य विकसित केले जात आहे.
मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे संग्रहित छायाचित्र
मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कौशल्य विकसित केले जात आहे. रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध करून देणे हे या विद्यापीठाचे यश आहे, असे मत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामार्फत शिक्षक दिनानिमित्त गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री लोढा बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. अपूर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास नाईक, अतिरिक्त आयुक्त अनिल सोनावणे, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन विजय कलंत्री, रजिस्ट्रार राजेंद्र तलवारे, अमृत योजनेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in