कोकणकन्या एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड; कोकण रेल्वे मार्गांवरील वाहतूक अद्याप उशिरानंच...

दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ही घटना घडली. त्यामुळे मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर
कोकणकन्या एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड; कोकण रेल्वे मार्गांवरील वाहतूक अद्याप उशिरानंच...

मध्यरात्री कोकणकन्या (Kokankanya Express) एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती. दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ही घटना घडली. त्यामुळे मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर रखडली होती. परिणामी अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या. पण अखेर पाच तासांनी बिघाड दुरुस्त करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आले, आणि कोकणकन्या एक्सप्रेस मार्गस्थ झाली. मात्र अजूनही कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या दोन ते साडेतीन तास उशिरानं धावत आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in