अभियांत्रिकी प्रवेशाची आज दुसरी गुणवत्ता यादी

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची दुसरी गुणवत्ता यादी ११ ऑगस्ट रोजी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळाल्यानंतरही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याकडे पाठ फिरवली.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची दुसरी गुणवत्ता यादी ११ ऑगस्ट रोजी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळाल्यानंतरही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याकडे पाठ फिरवली.

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील जागांवर प्रवेश देण्यासाठी पहिल्या गुणवत्ता यादीत १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. यापैकी ३२ हजार ६३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. पैकी १५ हजार ८५२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. सीईटी कक्षाने प्रवेश घेण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ दिली होती.

या विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार ‘फ्रीझ’

दुसऱ्या यादीत प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थांना १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागेल. पहिल्या तीन पसंतींचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश आपोआप ‘फ्रीझ’ होणार आहे. या विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांत संधी मिळणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in