जन्मठेपेतील कैद्याचे पलायन, अभिवचन रजा संपल्यानंतर नाही परतला

नरेंद्र गिरी हा ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्वत:हुन कारागृहात हजर होणे आवश्यक होते.
जन्मठेपेतील कैद्याचे पलायन, अभिवचन रजा संपल्यानंतर नाही परतला
Twitter

नवी मुंबई : कोल्हापूर कळंबा येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला व २८ दिवसांच्या अभिवचन रजेवर बाहेर आलेल्या एका कैद्याने अभिवचन रजा संपल्यानंतर कारागृहात हजर न होता, त्याने पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. नरेंद्र लालमणी गिरी असे या कैद्याचे नाव असून कळंबा कारागृह प्रशासनेने त्याच्या विरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील फरार झालेला कैदी नरेंद्र गिरी हा नवी मुंबईतील महापे परिसरात राहण्यास असून मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का स्पेशल केसमध्ये मुंबई शहर सत्र न्यायालयाने त्याला ऑगस्ट २०१२ मध्ये हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. गत नोव्हेंबर महिन्यामध्ये कैदी नरेंद्र गिरी याला २८ दिवसांच्या अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्याला ३० जानेवारी २०२४ पर्यंत रजा वाढवून देण्यात आली होती.

त्यानुसार नरेंद्र गिरी हा ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्वत:हुन कारागृहात हजर होणे आवश्यक होते. मात्र नरेंद्र गिरी हा कारागृहात हजर झाला नाही. त्यामुळे कोल्हापुर कारागृह प्रशासानने नरेंद्र गिरी राहत असलेल्या महापे येथील पत्यावर त्याचा शोध घेतला. मात्र तो त्याठिकाणी सापडला नाही. त्यानंतर कारागृह प्रशासनाने नरेंद्र गिरीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in