पुण्यात ‘दिल्ली रंगवू मराठी रंगात’ सोहळा; ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ९८ कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : संत-महापुरुषांच्या विचारांचा जागर, साहित्यिकांची ओळख, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव दाखविणाऱ्या गोंधळ, जागर, भारूड, ओव्या, उखाणे, लावणी अशा वैविध्यपूर्ण सादरीकरणातून दिल्ली रंगवू मराठी रंगात हा दिमाखदार सोहळा रंगला. या वेळी प्रसारित करण्यात आलेल्या हे मराठी बाहु झुंजत राहु आणि आम्ही असू अभिजात या संमेलन गीतांनी सभागृहात चैतन्य पसरले.
९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ९८ कार्यक्रमांचे आयोजन
९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ९८ कार्यक्रमांचे आयोजनraajendrra paatil
Published on

पुणे : संत-महापुरुषांच्या विचारांचा जागर, साहित्यिकांची ओळख, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव दाखविणाऱ्या गोंधळ, जागर, भारूड, ओव्या, उखाणे, लावणी अशा वैविध्यपूर्ण सादरीकरणातून दिल्ली रंगवू मराठी रंगात हा दिमाखदार सोहळा रंगला. या वेळी प्रसारित करण्यात आलेल्या हे मराठी बाहु झुंजत राहु आणि आम्ही असू अभिजात या संमेलन गीतांनी सभागृहात चैतन्य पसरले.

निमित्त होते सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या ९८ कार्यक्रमांच्या सांगता सोहळ्याचे. हा दिमाखदार सोहळा शनिवारी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आला होता. सरहद संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी यात उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमात अभिजात मराठी भाषेचे रंग भरले.

सुरुवातीस शारदास्तवन झाल्यानंतर सरहद शाळेतील शिक्षिकांनी महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला जाणाऱ्या साहित्यप्रेमींच्या गप्पांमधून बारा कोसावर बदलत जाणाऱ्या मराठी भाषेचा डौल दर्शविला. गाणी, कविता, उखाणे याद्वारे आपआपल्या प्रांतातील साहित्य-संस्कृतीची ओळख करून दिली.

शिक्षणाची महती सांगणारा मी सावित्री बोलतेय हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला. संत, साहित्यिकांच्या वेषात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण सादरीकरणातून मराठी भाषेची गोडी दर्शविली. विद्यार्थी-विद्यार्थिनींचे काव्य वाचन लक्ष्यवेधी ठरले.

संमेलनाविषयी दिल्लीकर मराठी भाषकांमध्ये आतुरता : माधुरी मिसाळ

मराठी भाषा मूलत:च समृद्ध आहे. मराठी भाषेतील साहित्य, नाट्य, परंपरा जतन करण्यासाठी काम केले गेले पाहिजे. महिलांनी आपल्यातील आंतरिक शक्ती जागृत करून उराशी स्वाभिमान बाळगावा. तसेच तो पुढच्या पिढीतही रुजवावा. दिल्लीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त दिल्लीतील मराठी भाषकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून मराठी दिल्लीकर संमेलनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. पराग काळकर म्हणाले, ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उत्तम वातावरण निर्मिती या कार्यक्रमाद्वारे झाली आहे. मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जामुळे प्रत्येक मराठी नागरिकाची जबाबदारी वाढली आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून विसर पडलेल्या मराठी संस्कृतीचे पुनर्भरण होत आहे.

प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, शिक्षण आणि आरोग्य समाजाची सर्वात मोठी गरज आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करण्याचा मानस आहे. दिल्लीच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासात ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in