
डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत आणि यावेळी त्यांनी BKC येथे आयोजित सभेत हे सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. बीकेसी येथील सभेत पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली.
सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशभरातील रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यासाठी मिशन मोडमध्ये काम सुरू आहे. महाराष्ट्रातील मुंबई लोकल आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीलाही याचा फायदा होत आहे. ते म्हणाले, "दुहेरी इंजिन असलेल्या सरकारला सामान्य माणसाला त्याच आधुनिक सुविधा, तीच स्वच्छता आणि विकासाचा तोच वेग द्यायचा आहे. त्यामुळेच आज रेल्वे स्थानकांचाही विमानतळाप्रमाणे विकास केला जात आहे. आता देशातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही विकास केला जात आहे.