सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेसमधील जेवणात आळ्या आढळल्याने खळबळ ; विद्यार्थी संतप्त

कॅम्पसमधील वसतिगृह क्रमांक आठमधील मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात आळ्या आढळल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेसमधील जेवणात आळ्या आढळल्याने खळबळ ; विद्यार्थी संतप्त
Published on

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये आळ्या सापडणे ही विद्यार्थ्यांसाठी नवीन गोष्ट नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्टीन, रिफेक्ट्री आणि हॉस्टेल मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाछ्या खालावलेल्या दर्जाबाबत आंदोलन करत आहेत. आता एका ताज्या घटनेत कॅम्पसमधील वसतिगृह क्रमांक आठमधील मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात आळ्या आढळल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर विद्यार्थी आता मेसचा ठेका तत्काळ रद्द करण्याची मागणी करत आहेत.

या घटनेचे विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याची बाबत पुन्हा एकदा समोर आली आहे. असं असलं तरीही विद्यापीठ प्रशासनाकडून यावर फार काही कारवाई केली जात नसल्याचं दिसत आहे.

विद्यार्थ्यांना वसतिगृह क्रमांक ८ आणि ९ च्या मेसमध्ये तयार केलेल अन्न दिल जातं. जेव्हा जेवणात आळ्या आढळल्या तेव्हा विद्यार्थ्यांनी तातडीने मेस कर्मचाऱ्यांना याबाबत कळवले. त्यानंतर मेसच्या ठेकेदारांनी खराब तांदूळ बदलण्याचं आश्वसन दिलं. ठेकेदारांकडून मेस चालवली जात असताना, त्यात गुणवत्ता नियंत्रणाचा अभाव आहे. वारंवार तक्रार करुनही त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी ठाम भूमिका घेतली असून मेसच्या कामाकाजावर देखरेख करणारी कॅन्टीन समिती स्थापन करण्यासाठी कुलगुरुंना बोलावलं आहे.

विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी या घटनेची माहिती नसल्याचं सांगितलं आहे . या घटनेच्या पार्श्वभूमीपर विद्यार्थ्यी संघर्ष कृती समितीसह अन्य संघटनांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. विद्यार्थीनींना घमकावल्याचा आरोप असलेल्या स्पेशल ड्युटी ऑफिसर संगीता देशपांडे यांना हटवण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. या आंदोलनात सामाजिक, राजकीय संघटनांसह विविध विभागातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना माजी सिनेट सदस्य संतोष ढोरे यांनी पाठिंबा दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in