कांद्याची आवक वाढल्यानंतर निर्यातबंदी उठेल -डॉ. भारती पवार

कांदा निर्यातबंदी झाली असून लवकर याबाबत केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल
कांद्याची आवक वाढल्यानंतर निर्यातबंदी उठेल -डॉ. भारती पवार

लासलगाव : कांद्याचे आगार म्हणून नाशिकची ओळख असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी झाली असून लवकर याबाबत केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

लासलगावजवळील निमगाव वाकडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजननंतर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या की, “कांदा निर्यातबंदीचा निर्णय ७ डिसेंबर रोजी झाला, त्याचदिवशी याबाबत मी वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांचे फोन येताहेत, याची माहिती त्यांना दिली होती. मीसुद्धा शेतकरी परिवारातील आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना जाणते. कांदा निर्यातबंदी उठली पाहिजे, यासाठी मी आग्रही आहे. लवकरच केंद्र सरकार निर्यातबंदीबाबत सकारात्मक निर्णय घेईल,” असे संकेत त्यांनी दिले. कांद्याची आवक वाढेल, त्याच वेळी कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी सरकार विचार करेल, असेही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in