विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ; २४ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

विधी तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने या अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज भरण्यास २४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ; २४ जुलैपर्यंत करता येणार अर्ज
Published on

मुंबई : विधी तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने या अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज भरण्यास २४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे काही कारणांमुळे प्रवेश अर्ज भरता न आलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये विधी ३ वर्ष अभ्यासक्रमांसाठी सुमारे १८ हजारहून अधिक जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीसाठी ८० हजार ५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ६८ हजार १४४ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली होती. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना ११ ते १८ जुलैपर्यंत मुदत दिली होती. या कालावधीत सुमारे ४० हजार २३४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. तर ३४ हजार ५४८ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत.

सीईटी कक्षाने विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे प्रवेश अर्ज भरण्यास २४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतवाढीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in