फडणवीस उतरणार मैदानात! लोकसभेची तयारी : फेब्रुवारीपासून प्रचाराचा धडाका

कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्याचा निर्धार भाजप, महायुतीच्या नेत्यांनी आधीच बोलून दाखविला आहे.
फडणवीस उतरणार मैदानात! लोकसभेची तयारी : फेब्रुवारीपासून प्रचाराचा धडाका
PM

राजा माने/ मुंबई

लोकसभा निवडणुकीचे वेध लागल्याने आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून, प्रत्येक पक्षाकडून नवनवी रणनीती आखली जात आहे. त्यात भाजप आघाडीवर असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन ४५ चा निर्धार पक्का करून निवडणूक मैदानात उतरण्याचे ठरवले आहे. त्यासाठी फेब्रुवारीपासूनच प्रचाराचा धडाका सुरू केला जाणार असून, फडणवीस यांनी रोज तीन सभा घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराचा धुरळा सुरू होण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपने मिशन ४५ यशस्वी करण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी राज्यात फोडाफोडीचे राजकारण करून शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एक गट सोबत घेतला आहे. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला असून, आता कोणत्याही परिस्थितीत राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकायच्याच, असा निर्धार करून त्यासाठी खुद्द फडणवीस यांनीच प्रचाराचा धडाका सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली असून, फेब्रुवारीपासून फडणवीस प्रचाराच्या कामाला लागणार आहेत. या दरम्यान ३ सभा घेण्याचे फडणवीस यांनी ठरवले आहे. यासंबंधीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राज्यात प्रचाराचा धडाका सुरू होऊ शकतो. अगोदरच विरोधकांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मात्र, लोकसभेच्या तयारीच्या दृष्टीने भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासूनच प्रचाराची राळ उठविली जाऊ शकते.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजपने मोठा विजय मिळविल्यामुळे नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे यावेळी फेब्रुवारी अखेरपर्यंतच लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच राजकीय हालचाली सुरू केल्या असून, नव्याने रणनीती आखली जात आहे. त्यात भाजपने एक पाऊल पुढे टाकत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी राज्य पिंजून काढण्याचे ठरविले आहे. त्यासाठी फडणवीस यांनी फेब्रुवारीत रोज ३ सभा घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराचा धडाका वाढणार आहे. 

भाजपने कंबर कसली

कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्याचा निर्धार भाजप, महायुतीच्या नेत्यांनी आधीच बोलून दाखविला आहे. त्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली असून, देशात लोकसभा जागांच्या दृष्टीने उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. त्यामुळे महायुतीने एकूण ४८ जागांपैकी मिशन ४५ लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी फेब्रुवारीपासूनच प्रचाराची राळ उठणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in