वाळू माफियांविरुद्ध शेतकऱ्याचे उपोषण

वाळूमाफिया विरोधात आंबोट गावातील स्थानिक शेतकरी जयवंत धर्मा मसणे उपोषण बसले आहेत. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी देखील उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम असून, शासनाच्या वतीने वाळू माफिया यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही.
वाळू माफियांविरुद्ध शेतकऱ्याचे उपोषण
Published on

कर्जत : वाळूमाफिया विरोधात आंबोट गावातील स्थानिक शेतकरी जयवंत धर्मा मसणे उपोषण बसले आहेत. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी देखील उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम असून, शासनाच्या वतीने वाळू माफिया यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे उपोषण कायम आहे. कर्जत तालुक्यातील पाली पोस्ट कोतवाल खलाटी येथील नदी पात्रामध्ये वाळू काढली जात आहे. गौळवाडी हद्दीतील पेज नदी पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन होत असून, स्थानिक शेतकरी जयवंत मसणे यांनी रीतसर पत्रव्यवहार करून तक्रार केली. तहसील कार्यालयात करण्यात आलेल्या तक्रारी नंतर भालीवडी तलाठी सजा यांच्याकडून पंचनामा करण्यात आला; मात्र वाळू उपसा करणाऱ्या विरुद्ध प्रशासन कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नसल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी जयवंत मसणे यांनी कर्जत तहसील कर्यालया बाहेर पाच फेब्रुवारी पासून उपोषण सुरू केले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवस पर्यंत महसूल विभागाचा कोणताही अधिकारी उपोषणकत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहचला नाही.

logo
marathi.freepressjournal.in