देशातील शेतकरी हेच खरे संशोधक; देवेंद्र फडणवीस यांचे उद्गार; कृष्णा कृषी, औद्योगिक महोत्सवाला सुरुवात

जगभरातील लोकांची आता विषमुक्त शेती आणि अन्नाकडे वाटचाल सुरू असल्याने आपणही विषमुक्त अन्नाकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
देशातील शेतकरी हेच खरे संशोधक; देवेंद्र फडणवीस यांचे उद्गार; कृष्णा कृषी, औद्योगिक महोत्सवाला सुरुवात

कराड : भारत हा कृषीप्रधान देश असून, या देशातील शेतकरी हेच खरे संशोधक आहेत. गेल्या काही दशकांत रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादन वाढले. परंतु, जमिनीचा पोत खालावत गेला. यामुळे शेतीतील विज्ञान नव्याने मांडून नवीन उद्योग समजावून घ्यावे लागतील. तसेच इस्रायलसारख्या देशाचे कृषी तंत्रज्ञान अवगत करून कृषी समृद्धीच्या दृष्टीने वाटचाल करणे गरजेचे असून जगभरातील लोकांची आता विषमुक्त शेती आणि अन्नाकडे वाटचाल सुरू असल्याने आपणही विषमुक्त अन्नाकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कृष्णा परिवाराने कृषी आणि उद्योग हातात हात घालून चालवता येतात, हे दाखवून दिले असून, यातूनच शेतकरी समृद्ध होऊ शकतो, हेही सिद्ध केले असल्याचे गौरोवोद्गार काढत कृष्णा कृषी आणि औद्योगिक महोत्सव सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सहकार महर्षी स्व.जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कृष्णा परिवारातर्फे येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित कृष्णा कृषी आणि औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, चित्रलेखा माने, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले,डॉ. अतुल भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी आ. आनंदराव पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विनायक भोसले, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,

सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी सुरू केलेले कार्य आज तीन पिढ्यांपासून अविरत चालू असून, सुरेशबाबा आणि डॉ. अतुल भोसले त्याला नवा आयाम देण्याचा प्रयत्न करत आहेत, ही सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून कृष्णा कृषी आणि औद्योगिक महोत्सव सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सहकार टिकवण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण

तसेच सहकार टिकवण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण आहे. त्यादृष्टीने साखर उद्योगात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय साखर सम्राटांनाही घेता आले नाहीत. मोदींमुळेच साखर उद्योगाला स्थैर्य मिळाले असून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख 45 हजार शेतकऱ्यांनी पिक विम्याचा लाभ घेतला असून केंद्र व राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजना, मागेल त्याला शेततळे, शेडनेट ड्रीप आदी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in