आता ३ हजारात मिळणार ‘फास्टॅग पास’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

‘फास्टॅग’वर आधारित वार्षिक पास देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केली. येत्या १५ ऑगस्ट २०२५ पासून ३ हजार रुपये किमतीचा ‘फास्टॅग’ आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येणार आहे. हा पास सुरू होण्याच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत किंवा २०० ट्रिप यापैकी जे पहिले असेल तोपर्यंत तो वैध राहणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीसंग्रहित फोटो
Published on

नवी दिल्ली : ‘फास्टॅग’वर आधारित वार्षिक पास देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केली. येत्या १५ ऑगस्ट २०२५ पासून ३ हजार रुपये किमतीचा ‘फास्टॅग’ आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येणार आहे. हा पास सुरू होण्याच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत किंवा २०० ट्रिप यापैकी जे पहिले असेल तोपर्यंत तो वैध राहणार आहे.

हा पास केवळ गैरव्यावसायिक खासगी वाहनांसाठी (कार-जीप-व्हॅन आदी) विशेष रुपात तयार करण्यात आला आहे. तो देशभरातील राष्ट्रीय महामार्गवर चालणार आहे. वाषिक पाससाठी लवकरच महामार्ग ॲप आणि ‘एनएचएआय’च्या संकेतस्थळावर एक स्वतत्र लिंक उपलब्ध केली जाणर आहे. ज्यामुळे पास उपलब्धता अधिक सुलभ होणार आहे.

यामुळे टोल नाक्यावर होणारी वाहनांची गर्दीही कमी होईल तसेच विविध कारणांमुळे नाक्यांवर होणारे वादही कमी होतील, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ही योजना फक्त खासगी (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठी उपलब्ध असेल. पास एकदा सक्रिय केल्यावर तो एक वर्ष किंवा २०० प्रवासांपर्यंत, यापैकी जे आधी संपेल, तेवढ्यासाठीच वैध असेल.

पास कसा काढायचा?

वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी एक स्वतंत्र लिंक लवकरच ‘हायवे ट्रॅव्हल अॅप’ आणि ‘एनएचएआय - एमओआरटीएच’ वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिक ही लिंक सुरू झाल्यानंतर या अधिकृत अॅपद्वारे हा पास ‘अ‍ॅक्टिव्हेट’ करू शकतील. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट्सवरूनही पास मिळवता येईल.

logo
marathi.freepressjournal.in