पुणे -सोलापूर महामार्गावर आराम बसचा भीषण अपघात ; दोन महिलांचा जागीच मृत्यू , तर तीस प्रवासी जखमी

नागरीकांच्या मदतीने बसमधील जे व्यक्ती जखमी होते त्यांना तत्काळ काढले
पुणे -सोलापूर महामार्गावर आराम बसचा भीषण अपघात ; दोन महिलांचा जागीच मृत्यू , तर तीस प्रवासी जखमी

पुणे - सोलापूर महामार्गावर आराम बसचा दौंड तालुक्यातील पाटस इथं भीषण असा अपघात झाला आहे. लातूरहून पुण्याला जात असताना या आराम बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन महीला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक प्रवासी गंभीर आणि तीस प्रवाशी जखमी झाले आहेत.

याबद्दल सविस्तर माहिती पाटस पोलीस चौकीचे फौजदार संजय नागरगोजे यांनी दिली आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाने लातुरहून एक आराम बस प्रवाशांना घेवून पुण्याकडे जात होती. पहाटेच्या सुमारास दौंड तालुक्यातील पाटस घाटात एक बंद सिमेंट वाहतुकीच्या ट्रकला या आराम बसची जोराची धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की बस भररस्त्यात उलटी झाली.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहचले. यावेळी नागरीकांच्या मदतीने बसमधील जे व्यक्ती जखमी होते त्यांना तत्काळ बाहेर काढुन उपचारासाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आलं आहे. मृत व्यक्तींना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. यावेळी पुरुष, महिला, लहान मुले-मुलींसह एकुण तीस जण जखमी झाले. गंभीर जखमी व्यक्तीला उपचारासाठी ससुन रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in