पुणे-बंगळूरु महामार्गावर भीषण अपघात ; बहीण भावासह तिघांचा जागीच मृत्यू

कराड तालुक्यातील पाचाड फाटा या ठिकाणी हा अपघात झाला आहे.
पुणे-बंगळूरु महामार्गावर भीषण अपघात ; बहीण भावासह तिघांचा जागीच मृत्यू

पुणे-बंगळूरु महामार्गावर कराडजवळ भीषण अपघात घडला आहे. एका चारचाकी वाहनाने ट्रकला पाठिमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला असून यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात मरण पावलेल्यांमध्ये बहीण भावाचा समावेश आहे. कराड तालुक्यातील पाचाड फाटा या ठिकाणी हा अपघात झाला आहे.

हा अपघात घडल्यानंतर काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वेगात आलेली चारचारी पुढे असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने मागूनच गाडीने ट्रकला धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.

भारती जाधव, अभिषेक जाधव आणि नितीन पोवार असं या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अभिषेक हा मुंबई पोलिसात कार्यरत आहे.

अभिषेक जाधव, भारती जाधव आणि नितीन पोवार हे चारचाकी गाडीने मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी त्यांची गाडी कराड जवळील पाचवड फाटा परिसरात आली. या चारचाकीचा वेग जास्त होता. यावेळी समोरली ट्रकचा अंजाद न आल्याने चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट ट्रकला धडकली. या अपघाता तिघांचा जागीच मृत्यू झाला असून गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in