वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

महसूल अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

वसई : वसईतील मुळगाव येथे राहणाऱ्या डिसोजा पिता पुत्राने एकाच वेळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जमिनीच्या प्रलंबित प्ररणातून वसई महसूल अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासामुळे ही आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. डिसोजा पिता-पुत्रांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी वसई पोलिसांना सापडली असून, त्यानुसार संबंधितांवर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सायंकाळी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेवून चौकशी सुरू केली असून, मात्र नेमके कुणाला अटक करण्यात आले, हे उशीरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

वसई पश्चिमेच्या मुळगाव येथील मोठेगावात डिसोजा कुटुंबिय राहतात. त्यांच्या जमिनीचे एक प्रकरण तलाठी कार्यालयात प्रलंबित होते. त्यासाठी एडविन डिसोजा (वय ५५) आणि त्यांचा मुलगा कुणाल (वय २८) सतत फेऱ्या मारत होते. त्यांच्या जमिनीचा वारसाहक्क नाकारून फेरफार एकतर्फी रद्द करण्यात आला होता.यासाठी ते संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे सतत वर्षभर फेऱ्या मारत होते. यामुळे ते कमालिचे निराश झाले होते. या प्रकरणी महसूल अधिकाऱ्यांकडून प्रचंड त्रस्त असल्याचा व्हिडीओ सुद्धा आज सर्वत्र व्हायरल झाला आहे.

आत्महत्येपूर्वी डिसोजा पिता-पुत्रांनी चिठ्ठी लिहिली असून, काही जणांची नावे लिहिली आहेत. त्याअनुषांगाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

- सुनिल पवार, पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in