पित्याने केला मुलीवर अत्याचार; ४ महिन्यांची गर्भवती राहिल्यावर आईकडून दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पत्नी गाढ झोपेत असताना एका नराधमाने पोटच्या १३ वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार केल्याने खेळण्या-बागडण्याच्या वयात तिच्यावर ४ महिन्यांची गर्भवती राहण्याचा दुर्दैवी प्रसंग
मुंबईत वृद्ध महिलेवर बलात्कार
मुंबईत वृद्ध महिलेवर बलात्कारप्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूने वापरली जाते

कराड : पिता-पुत्रीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना साताऱ्यातील माण तालुक्यात घडली असून, पत्नी गाढ झोपेत असताना एका नराधमाने पोटच्या १३ वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार केल्याने खेळण्या-बागडण्याच्या वयात तिच्यावर ४ महिन्यांची गर्भवती राहण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. मात्र सदर अत्याचारग्रस्त मुलीच्या आईने नराधम पित्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान,पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित नराधम बापाला तातडीने ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या.दहिवडी येथील न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र या घटनेमुळे माण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सदर अत्याचारग्रस्त पीडित मुलीच्या आईने फिर्यादीवरून गेल्या दोन वर्षांपासून तिचा पती हा त्याच्याच पाऊने तेरा वर्षांच्या मुलीवर वारंवार पाशवी अत्याचार करत होता.आपल्याच घरात रात्रीच्या वेळेस आपली पत्नी गाढ झोपेत असताना तो मुलीवर अत्याचार करत होता व त्यातूनच ती मुलगी चार महिन्याची गरोदर राहिली. त्यामुळे तिला त्रास होऊ लागल्याने तिने तिच्या आईला घडलेला सारा प्रकार सांगितला.हे सर्व ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली.तिने तातडीने बुधवार, ३१ जानेवारी रोजी रात्री १ वाजता दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.याबाब तची फिर्याद दाखल होताच दहिवडी पोलीसांनी नराधम बापाला ताब्यात घेत त्याला बेड्या ठोकल्या. दहिवडीच्या डीवायएसपी अश्विनी शेंडगे यांनी पीडित मुलीची भेट घेतली असून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली.

नराधम बाप हा आपली पत्नी व मुलीसह माण तालुक्यातील एका गावात राहतो. रात्री पत्नी गाढ झोपेत असताना मुलीला बाजूला घेत तो आपल्याच मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार करत होता.मात्र याची कोठेही वाच्यता न करण्याची धमकी मुलीला दिल्यामुळे ती मलगी भेदरली होती. भीतीमुळे याबाबत तिने कोठेही वाच्यता केली नाही.मात्र जेव्हा मुलीला शारीरिक त्रास होऊ लागला तेव्हा तिच्या आईने तिला डॉक्टरांना दाखविले असता त्यांनी ती ४ महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. यानंतर आईने मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली असता तिने घडला सारा प्रकार वडिलांनी केला असल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in