शाळांमधील उपाहारगृहांसमोर खाद्ययादीचा पेच; जंक फूड नियमांमुळे शाळांबाहेरील स्टॉलवर संक्रांत

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शाळा परिसरातील ५० मीटर हद्दीमध्ये जंक फूड जाहिरात वितरणावर बंदी घेतली आहे. यामुळे शाळांबाहेर वडापाव, समोसा पाव, ब्रेडरोल, मंच्युरियन रोल, चायनीज भेळ वगैरे खाद्यपदार्थ विक्री करणारे स्टॉलमालक आणि शाळांमधील उपहारगृह चालक व शाळा प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
शाळांमधील उपाहारगृहांसमोर खाद्ययादीचा पेच; जंक फूड नियमांमुळे शाळांबाहेरील स्टॉलवर संक्रांत
शाळांमधील उपाहारगृहांसमोर खाद्ययादीचा पेच; जंक फूड नियमांमुळे शाळांबाहेरील स्टॉलवर संक्रांत'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शाळा परिसरातील ५० मीटर हद्दीमध्ये जंक फूड जाहिरात वितरणावर बंदी घेतली आहे. यामुळे शाळांबाहेर वडापाव, समोसा पाव, ब्रेडरोल, मंच्युरियन रोल, चायनीज भेळ वगैरे खाद्यपदार्थ विक्री करणारे स्टॉलमालक आणि शाळांमधील उपहारगृह चालक व शाळा प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या जंक फूड नियमांमुळे शाळांबाहेरील स्टॉलवर संक्रांत येण्याची भीती स्टॉलधारक व्यक्त करत आहेत.

मुंबईतील दादर-माटुंगा भागातील एका नामांकित शाळेबाहेरच्या पदपथावर विविध जंक फूडची विक्री होत होती. शाळेतील मुलेही वडापाववर ताव मारतात, तर महाविद्यालयांच्या नाक्यांवर सँडविच, समोसे, वडे, मोमोज अशा पदार्थांची विक्री होते. त्यामुळे शाळा महाविद्यालयाच्या ५० मीटरबाहेर असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांचे काय करणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे.

एफडीएने कॅन्टिन, मध्यान्ह भोजन केंद्र, वसतिगृहातील स्वयंपाकघर तसेच शाळांमध्ये अन्न पुरवणाऱ्या सगळ्यांनाच ‘एफएसएसएआय’चा परवाना बंधनकारक केला आहे.

शाळा परिसरात सिगारेट, तंबाखूची सर्रास विक्री

यापूर्वी शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी केवळ कागदोपत्री राहिली आहे. आजही अनेक शाळा परिसरात सिगारेट, तंबाखू, मद्यविक्री सर्रास उपलब्ध होतात. त्यामुळे ५० मीटर हद्दीचा मुद्दा हास्यास्पद असल्याचेही पालकांकडून सांगण्यात येत आहे. शाळा परिसरात बंदी असली तरी ५० मीटरच्या बाहेर असलेल्या स्टॉलवर हे सगळे पदार्थ विद्यार्थी खाऊ शकतात. सध्या बऱ्याच शाळांच्या मुख्य प्रवेशद्वारापासून १०० मीटरपर्यंत सिगारेट-तंबाखू सहज उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे या आदेशांचेही असेच होईल का, अशी शंकाही काही पालकांनी व्यक्त केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in