Video | डोंबिवलीतील बहुमजली इमारतीला भीषण आग; ३-४ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

या इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात असले तरी आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस तसेच अग्निशमन दलाकडून आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याचा शोध घेतला जात आहे.
Video | डोंबिवलीतील बहुमजली इमारतीला भीषण आग; ३-४ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

आज दुपारी 1: 23 वाजेच्या सुमारास डोंबिवलीतील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. डोंबिवलीतील खोणी पलावा येथील लोढा हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील कासा ऑरेलिया इमारतीला ही लागली. आगीची माहिती मिळताच तीन ते चार अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी 2:30 वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पलावा अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीमधील एका घराला आग लागल्यानंतर ती संपूर्ण इमारतीमध्ये पसरत गेली. सुदैवाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंतच रहिवासी राहत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. आग लागताच त्या सर्वांना सुखरुपणे बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

या इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात असले तरी आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस तसेच अग्निशमन दलाकडून आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याचा शोध घेतला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in