दारू पीत असताना खुर्चीला धक्का लागला, डोंबिवलीत राडा झाला; दोन तासांत आरोपींना बेड्या

मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील सेवन स्टार हॉटेलमध्ये अजय सिंग व त्याचे चार मित्र दारू पीत बसले होते.
दारू पीत असताना खुर्चीला धक्का लागला, डोंबिवलीत राडा झाला; दोन तासांत आरोपींना बेड्या

डोंबिवली : दारू पीत असताना खुर्चीला धक्का लागल्याने रागाच्या भरात तरुणावर पिस्तुलीने गोळी झाडल्याचा प्रकार मंगळवारी रात्रीच्या वेळी डोंबिवली पुर्वेकडील सेवन स्टार हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील सेवन स्टार हॉटेलमध्ये अजय सिंग व त्याचे चार मित्र दारू पीत बसले होते. बाजूच्या टेबलावर विकास भंडारी दारू पीत असताना खुर्च्याला धक्का लागल्याने वाद सुरू झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाल्यावर अजय सिंगने रागाच्या भरात आपल्या जवळील पिस्तुलाने गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी विकासाच्या खांद्याला लागल्याने हल्ल्यात बचावला. त्याला उपचारासाठी रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. पकडले जाण्याच्या भीतीने अजय सिंग व त्याचे मित्र तेथून पळाले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अजय सिंग आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांसह पोलीस पथकाने दोन तासांत अजय सिंग आणि त्याच्या चार साथीदाराला बेड्या ठोकून अटक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in