भाजप चित्रपट आघाडीतर्फे १ ते ३ मार्चला चित्रपट महोत्सव; जळगाव येथील स्थानिक कलावंतांना दिग्दर्शकांशी संवाद साधण्याची संधी

भाजपा चित्रपट आघाडीच्या वतीने जळगावला चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून, यात सहा चित्रपट दाखवले जाणार आहेत.
 भाजप चित्रपट आघाडीतर्फे १ ते ३ मार्चला चित्रपट महोत्सव; जळगाव येथील स्थानिक कलावंतांना दिग्दर्शकांशी संवाद साधण्याची संधी

जळगाव : भाजपा चित्रपट आघाडीच्या वतीने जळगावला चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून, यात सहा चित्रप्ट दाखवले जाणार आहेत. या महोत्सवाचे वेगळेपण म्हणजे स्थानिक कलावंतांना संबंधीत दिग्दर्शकांशी संवाद साधता येणार असल्याची माहिती भाजपा चित्रपट आघाडीचे प्रदेश अध्यक्ष समीर दीक्षित यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. पत्रकार परिषदेस सुरेश भोळे आघाडीचे महानगराध्यक्ष रोहित चौधरी चित्रपट कलावंत भास्कर जुनागडे, मालती जुनागडे, पवन खंबायत उपस्थित होते.

यावेळी बोलतांना समीर दीक्षित यांनी पुण्यामुंबईत चित्रपट महोत्सवांचे आयोजन केले जाते तेथील रसिक, कलावंत चित्रपटाचा रसास्वाद घेऊ शकतात; मात्र राज्यातील अन्य जिल्हयात असे आयोजन होत नसल्याने तेथील कलावंत रसिक या पासून वंचीत राहतात ही बाब चित्रपट आघाडीच्या लक्षात आली असून, मराठी चित्रपट हे राज्यभर लोकांना पाहता आले पाहिजेत, ग्रामीण भागात देखील टॅलेंट असून स्थानिक कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, कलावंतांशी संवाद साधता आला पाहिजे, स्थानिक कलावंतांना यातून मार्गदर्शन मिळेल, उत्तेजन मिळेल या जाणिवेतून विविध जिल्हयातून आघाडीच्या माध्यमातून चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याचा चित्रपट आघाडीचा मानस असून याची सुरवात ही जळगाव पासून करत आहोत. ५० वर्षांनंतर जळगावला असा महोत्सव होत असून, १ ते ३ मार्च या कालावधीत सहा चित्रपटांचे आयोजन या चित्रपट महोत्सवात केले असून हे चित्रपट विनामूल्य पाहता येणार असल्याचे समीर दीक्षित यांनी सांगितले.

या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आर्ट गॅलरी ही संकल्पना राबवली जाणार असून, चित्रपट थिएटरमध्ये स्थानिक कलावंतांची माहिती फोटोच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहचवली जाण्याचा प्रयत्न केला जाईल, स्थानिक कलावंतांचा सत्कार आयोजित केला जाईल यातून स्थानिक कलावंतांना उत्तेजन मिळेल. चित्रपट आघाडीच्या कार्याची माहिती देऊन मराठी चित्रपटांसाठी दिले जात असलेले अनुदान वाढवून मागणार असल्याचे समीर दीक्षित यांनी सांगितले. आ. सुरेश भोळे यांनी बोलतांना जळगावकरांनी यास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद द्यावा, स्थानिक कलावंतांनी याचा फायदा उचलावा, असे आवाहन केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in