नागपूरमध्ये फिल्मसिटी उभारणार; मराठी चित्रपटांसाठी दक्षिण मुंबईत थिएटर, राज्यात ७५ नवे चित्रपट-नाट्यगृह साकारणार : मुनगंटीवार

मुंबई, कोल्हापूरप्रमाणे लवकरच महाराष्ट्राच्या उपराजधानीत १५० एकर जागेवर फिल्मसिटी साकारण्यात येणार आहे. तसेच नरिमन पॉइंट येथे मराठी चित्रपटांसाठी थिएटर उभारण्यात येणार असून राज्यात ७५ नवीन चित्रपट-नाट्यगृह बनवण्यात येणार आहे.
२१ चित्रपट निर्मात्यांना २९ कोटी २२ लाख रुपयांचे धनादेश वितरण करण्यात आले.
२१ चित्रपट निर्मात्यांना २९ कोटी २२ लाख रुपयांचे धनादेश वितरण करण्यात आले.
Published on

मुंबई : मुंबई, कोल्हापूरप्रमाणे लवकरच महाराष्ट्राच्या उपराजधानीत १५० एकर जागेवर फिल्मसिटी साकारण्यात येणार आहे. तसेच नरिमन पॉइंट येथे मराठी चित्रपटांसाठी थिएटर उभारण्यात येणार असून राज्यात ७५ नवीन चित्रपट-नाट्यगृह बनवण्यात येणार आहे. 

राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार नेहमीच चित्रपटसृष्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दर्जेदार मराठी चित्रपट निर्मित्यांना सरकार आर्थिक मदतीचा हात नेहमीच पुढे करते. शासन मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे असून मराठी चित्रपटसृष्टीने आता जागतिक झेप घ्यावी, असेही ते म्हणाले.

दर्जेदार मराठी चित्रपटांना अनुदान वाटपाच्या कार्यक्रमात सह्याद्री अतिथीगृहात ते बोलत होते. मराठी चित्रपट निर्मात्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजनेची अंमलबजावणी शासन करणार आहे.

दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीची सुरुवात केली. दादा कोंडके या साध्या माणसाचे सगळे चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले. तर रजनीकांत या मराठी अभिनेत्याने अभिनयाच्या जोरावर दक्षिणेत सर्वांची मने जिंकली आहेत. त्यांचा आदर्श मराठी चित्रपटसृष्टीनेसमोर ठेवावा, असेही ते म्हणाले.

सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळामार्फत दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य म्हणून धनादेश वाटप करण्यात आले. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या ४७ वर्धापन दिनाचा मुहूर्त साधून या चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन केले.

अ, ब आणि क या तीन श्रेणीत मोडणाऱ्या दर्जेदार चित्रपटांना हे अर्थसहाय्य  देण्यात आले. या कार्यक्रमात अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते.

मुनगंटीवार यांनी सांगितले की, दर्जेदार चित्रपट निर्मात्यांना शासनामार्फत आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी हा प्रयत्न आहे. हा फक्त धनादेश नाही तर महाराष्ट्राच्या १३.५० कोटी जनतेच्या या शुभेच्छा आहेत. मराठी चित्रपटसृष्टीने अजून प्रगती करावी. जसे दक्षिणात्य भाषेचे चित्रपट हा मराठी मध्ये डबिंग करून दाखवले जातात तसे भविष्यात मराठी चित्रपट दक्षिणात्य व अन्य भाषेमध्ये डबिंग करून दाखवला गेले पाहिजेत.

२१ चित्रपट निर्मात्यांना अर्थपाठबळ

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त तसेच अ दर्जा प्राप्त असलेल्या महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांना पाच लाख रुपये धनादेशचे वितरण करण्यात आले. तिचं शहर होणे या चित्रपटासाठी रसिका आगाशे, येरे येरे पावसासाठी शफक खान, बटरफ्लायसाठी मीरा वेलणकर, गिरकी या चित्रपटासाठी कविता दातीर यासह राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वाळवी चित्रपटाला दुप्पट अनुदान देण्यात आले. या कार्यक्रमात ७७ अ व ब वर्ग दर्जाच्या व तसेच प्रथमच समावेश केलेल्या क वर्गाच्या २१ चित्रपट निर्मात्यांना २९ कोटी २२ लाख रुपयांचे धनादेश वितरण करण्यात आले.

चित्रपट निर्मात्यांसाठी निःशुल्क चित्रीकरण

मराठी चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटासाठी आवश्यक अशा जागी करायचे आहे त्यांना तिथेच नि:शुल्क चित्रीकरण करता येणार आहे. उत्तम चित्रपट तयार करण्यासाठी मराठी निर्मात्यांनी खूप मेहनत घेतलेली असते. मात्र कधी यश मिळते, तर कधी अपयशाला सामोरे जावे लागते, मात्र त्यामुळे खचून जायचे नाही, असे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in